मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य आमदार दिवाकर रावते, सुभाष देसाई, विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड, अपक्ष आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे, भाजपचे आमदार प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचा निरोप समारंभ २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत करण्यात आला. या सर्व सदस्यांनी सभागृहात त्यांची मते व्यक्त केली. पुढील विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वी या सर्व आमदारांच्या सदस्यत्वाचा कालावधी संपत आहे.