मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीमध्ये गुंड दाऊद इब्राहिम हा कराची शहरात असल्याचे उघड झाले आहे. दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने ही माहिती चौकशीच्या वेळी दिली. अंमलबजावणी संचालनालय आर्थिक घोटाळ्याचे अन्वेषण करत आहे.
Salim Qureshi, who was questioned by the ED in the probe against #DawoodIbrahim and his gang, revealed that Ibrahim and Chota Shakeel lived in Clifton area of #Karachi.
(@divyeshas )https://t.co/0U3hm7u5sC— IndiaToday (@IndiaToday) May 24, 2022
दाऊदच्या भाच्याने सांगितले, ‘दाऊद इब्राहिमशी माझा कोणताही संपर्क नाही; मात्र त्याची बायको महजबीन हिने सणांच्या काळात माझी पत्नी आणि बहीण यांच्याशी संपर्क केला होता.’ विशेष न्यायालयाने संचालनालयाने सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद कंपनीशी संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. विशेष न्यायालयाने म्हटले आहे, ‘आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या हसिना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्यासह गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली. त्यामुळे त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत (मनी लाँड्रिंगविरोधी कायदा) कारवाई करता येईल. या सर्वांनी या गुन्ह्यांतून मिळणारे उत्पन्न हे अवैध कृत्यांमधून मिळवले आहे.’