शिवसेनेकडून कितीही नोटिसा आल्या, तरी घाबरणार नाही ! – एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली असून धारिकांचे काम पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील मंत्र्यांची लगबग वाढली आहे !

विद्यार्थी आणि तरुण यांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय !

कोरोना महामारीच्या काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे नोंद केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रीय समित्यांना कार्यवाही करण्यासाठी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे ! – नाना पटोले, काँग्रेस

अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत, त्रास देतात, अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही माझ्याकडे केल्या होत्या.

मुंबईत ८ दिवसांत पाणीकपातीचा निर्णय !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या ७ धरणांतील पाणीसाठा वेगाने आटत आहे.

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

अभिनेत्री केतकी चितळे यांना जामीन संमत !

पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने नोंद केल्याचा दावाही केतकी यांनी याचिकेतून केला होता. त्यानंतर आता केतकी यांना जामीन संमत करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण !

गेल्या दोन दिवसांपासून कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २१ जूनच्या रात्री चाचणीतील अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० टक्के पाणीसाठा शेष !

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या धरण क्षेत्रात लवकरच समाधानकारक पाऊस पडला नाही, तर यंदा मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या धरणांमध्ये सध्या केवळ १० टक्के पाणीसाठा शेष आहे.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदारांसह बंड !

शिवसेनेत किंमत दिली जात नसल्याच्या कारणावरून अप्रसन्न असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे.

मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !

हवामान विभागाने २० आणि २१ जून या दिवशी मुंबईसह उपनगरासाठी अन् २० ते २३ जून या कालावधीत कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.