संतप्त हिंदूंकडून ८ दिवसांत सर्व मुसलमानांना गाव सोडण्याची चेतावणी
नवी देहली – देवभूमी उत्तराखंडमधील चमोली येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर मुसलमान तरुणाने बलात्कार केला. या घटनेनंतर हिंदूंनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. मुसलमान तरुणाच्या या घृणास्पद कृत्यामुळे हिंदु संघटना आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. बलात्कारी दिलबर खान याला पोलिसांनी थरळी बाजारपेठेत अटक केली आहे. त्याने १० ऑक्टोबरला अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करून त्याचा अश्लील व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित केला होता.
(भारतात अल्पसंख्य मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्या साम्यवादी प्रसारमाध्यमे, कथित बुद्धीप्रामाण्यवादी, सेक्युलरवादी, सर्वधर्मसमभाववाले, शहरी नक्षलवादी यांना अल्पसंख्य मुसलमानाची ही घृणास्पद कृत्ये दिसत नाहीत कि ते याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत ?- संपादक) संतप्त हिंदूंनी दिलबर खान याला फाशी देण्याची मागणी केली आहे. तसेच ८ दिवसांत सर्व मुसलमानांना थरळी सोडण्याची निर्वाणीची चेतावणी देण्यात आली आहे.
थरळी परिसरात पोलीस तैनात !
या घटनेच्या निषेधार्थ पिंडर घाटीतील लोकांनी १० ऑक्टोबर या दिवशी दिवसभर थरळी बाजारपेठ बंद ठेवली. बलात्कारी दिलबर खान थरळी येथे न्हाव्याचे काम करायचा. त्याने इन्स्टाग्रामवर पीडित हिंदु मुलीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो प्रसारित केला. थरळी परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाभारतात अल्पसंख्याक मुसलमान कि बहुसंख्याक हिंदु असुरक्षित ? |