स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांना जिवे मारण्याची धमकी !

या पत्रात लिहिले आहे की, देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाहीत. तुम्ही केवळ तुमच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावे.

राज्यातील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक ४ ऑगस्टला होणार ! – निवडणूक आयोग

राज्याच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित केली आहे. ५ जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट या दिवशी मतदान होणार असून ५ ऑगस्टला मतमोजणी होईल.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय दुग्धशाळा विक्रीला काढल्या !

सरकारी योजना डबघाईला आणून स्वतःचे खासगी व्यवसाय भरभराटीला आणणे, हा स्वार्थी राजकारण्यांचा जनताद्रोहच ! या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे !

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

‘‘संख्याबळ असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. फडणवीस यांच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.’’

कोरोनाच्या काळात शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी सरकार ‘झिरो ड्रॉपआऊट मिशन’ राबवणार !

मराठीच्या उपयोगासाठी विविध कार्यक्रम घोषित करणार्‍या सरकारने सर्व शासकीय उपक्रमांची नावे मराठीत ठेवून स्वत:पासून याचा प्रारंभ करावा !

इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ववत् शिकवला जाणार !

कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण ऑनलाईन घेण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण न्यून व्हावा, यासाठी इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अभ्यासक्रम २५ टक्के न्यून करण्यात आला होता.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी !

पत्रात पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच बलात्कार करण्याचीही धमकी दिली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचे लिहिले आहे.

एस्.टी.च्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असल्यामुळे यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये; म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.

मनसेच्या आमदाराने समर्थन देण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची चर्चा !

मनसेचा विधानसभेत १ आमदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी भ्रमणभाषवर चर्चा झाली.

सिडको गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा मृत्यू, २ जण घायाळ !

गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर २ कामगार घायाळ झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी लोखंडी क्रेनचे मोठे सामान खाली पडले. त्यात चौघांचा मृत्यू झाला.