बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राज्य स्थापन झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत, अशी हिंदुत्वाला धरून राज्यकारभार करण्याची ग्वाही नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

(म्हणे) ‘औरंगजेबाचे नाव हटवून भारताला विनाशाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे !’

औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करून शासनाने काय साध्य केले ? नाव पालटल्याने कुठला विकास होणार आहे कि कुठली रोजगारनिर्मिती होणार आहे ? मुसलमानांचे नाव हटवून कोणता संदेश दिला जात आहे ?

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे अधिवक्ता राहुल नार्वेकर यांचा बहुमताने विजय

मागील २ वर्षांपासून रिक्त असल्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ३ जुलै या दिवशी भाजपचे अधिवक्ता राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त ! – राष्ट्रीय कुस्ती संघटनेचा निर्णय

गेल्या काही दिवसांत कुस्तीगीर संघाच्या कामाविषयी अनेक तक्रारी येत होत्या. संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते’, असे शरद पवार यांनी सांगितले.

हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदने !

‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी या निवेदनात केली.

वर्ष २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी घालणार ! – मुंबई महापालिका

शाडूच्या मातीच्या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचाच वापर करावा’, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. उच्च न्यायालयानेही ती बंदी योग्यच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी ‘पीओपी’च्या मूर्तीला अनुमती द्यावी’, अशी मागणी केली होती.

विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी यांचे नाव निश्चित !

गेल्या काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

आजपासून विधानसभेचे अधिवेशन, तर ४ जुलैला सरकारची बहुमताची परीक्षा !

राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ४ जुलै या दिवशी बहुमत सिद्ध करायचे आहे. तत्पूर्वी ३ जुलै या दिवशी राज्य विधानसभेचे २ दिवसांचे ‘विशेष अधिवेशन’ चालू होणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३ आणि ४ जुलै या दिवशी विशेष अधिवेशन बोलावले आहे. ३ जुलै या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

८ मंत्र्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी १ लाख रुपये जमा करा ! – उच्च न्यायालय

ही याचिका सकृतदर्शनी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.