उमेश कोल्हे यांच्या हत्येतील आरोपीवर कारागृहात आक्रमण: ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मुंबई – भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ प्रसारित करणारे अमरावती येथील पशूवैद्यकीय औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शाहरूख पठाण तथा बादशाह हिदायत खान याच्यावर आर्थर रोड कारागृहात आक्रमण झाले. या प्रकरणी पोलिसांनी बंदीवान कल्पेश पटेल, हेमंत मनियार, अरविंद यादव, संदीप जाधव, श्रवण आवणे यांसह ७ जणांविरुद्ध … Read more

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.

अभिनेता रणवीर सिंह याला सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध यादव यांच्याकडून कायदेशीर नोटीस !

सामाजिक माध्यमांवर स्वत:ची नग्न छायाचित्रे प्रसारित केल्याच्या प्रकरणी नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिरुद्ध यादव यांनी अभिनेता रणवीर सिंह याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

राज्यात १७३ जणांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण !

राज्यात ‘स्वाईन फ्ल्यू’चा (विशिष्ट विषाणूंमुळे येणारा ताप) धोका वाढत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून या तापाचे रुग्ण वाढले आहेत.

मुंबईमधील २३६ प्रभागांसाठी २९ जुलै या दिवशी आरक्षण सोडत !

महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत २९ जुलै या दिवशी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृह येथे काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये इतर मागासवर्गासाठी ६३ प्रभागांतील आरक्षण आणि महिला आरक्षण घोषित होणार आहे.

(म्हणे) ‘बाबासाहेब पुरंदरे यांचे विकृत लिखाण शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यासाठी होते !’

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ज्या पक्षाने अफझलखान वधाचे चित्र हटवण्यास भाग पाडून खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी बोलणे हास्यास्पद होय.

मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संप !

प्रलंबित भाडे दरवाढ करणे, परवानेवाटप बंद करणे, तसेच रिक्शा-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी पुरवणे अशा विविध मागण्या मान्य न झाल्यास कोकण विभाग रिक्शा-टॅक्सी महासंघाने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.

मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून चालू ! – राज्य निवडणूक आयोग

१ ऑगस्टपासून मतदान ओळखपत्र आधारकार्डला जोडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २५ जुलै या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

७० मीटरहून अधिक उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बंधनकारक ! – राज्य सरकार

राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील उंच इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेच्या दृष्टीने ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ (आग लागल्यानंतर नागरिकांना बाहेर काढण्याचे उद्वाहन) बसवणे बंधनकारक केले आहे.

राज्यातील ५ मोठ्या धरणांतील गाळ काढण्याचा निर्णय !

राज्यातील उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या ५ जुन्या धरणांत साठलेला गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मागवण्यात येणार्‍या निविदा कागदपत्रांचे मानक प्रारूप सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाने समिती स्थापन केली आहे.