मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – १ ऑगस्टपासून मतदान ओळखपत्र आधारकार्डला जोडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २५ जुलै या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘‘मतदान ओळखपत्र आधारकार्डला जोडणे, हे कुणालाही बंधनकारक नाही; परंतु तसे केल्यामुळे निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणार्या सुविधांविषयीचा संदेश भ्रमणभाषवर पाठवता येईल. ज्यांना मतदान ओळखपत्र आधारकार्डला जोडायचे नाही, त्यांना मतदान ओळखपत्र काढण्यासाठी अन्य ११ कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्र बनवता येईल. आधारकार्डविषयी प्राप्त झालेली माहिती निवडणूक आयोगाकडून अत्यंत गोपनीय राखली जाईल.