मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संप !

प्रलंबित भाडे दरवाढ करणे, परवानेवाटप बंद करणे, तसेच रिक्शा-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी पुरवणे अशा विविध मागण्या मान्य न झाल्यास कोकण विभाग रिक्शा-टॅक्सी महासंघाने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.

मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून चालू ! – राज्य निवडणूक आयोग

१ ऑगस्टपासून मतदान ओळखपत्र आधारकार्डला जोडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २५ जुलै या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

७० मीटरहून अधिक उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बंधनकारक ! – राज्य सरकार

राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील उंच इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेच्या दृष्टीने ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ (आग लागल्यानंतर नागरिकांना बाहेर काढण्याचे उद्वाहन) बसवणे बंधनकारक केले आहे.

राज्यातील ५ मोठ्या धरणांतील गाळ काढण्याचा निर्णय !

राज्यातील उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या ५ जुन्या धरणांत साठलेला गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मागवण्यात येणार्‍या निविदा कागदपत्रांचे मानक प्रारूप सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाने समिती स्थापन केली आहे.

मुंबई येथील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच !

मुंबई येथील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच आहे. २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या अधिसूचनेनुसार कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतच चालेल, इंग्रजी किंवा उर्दू भाषेत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा विशेष ‘मकोका’ न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

मुंबई महानगरपालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाची चेतावणी !

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे पदव्युतरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांवर कामाचा ताण येत आहे. हे लक्षात घेता वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, असे प्रसिद्धीपत्रक मार्डकडून काढण्यात आले आहे.

मुंबईत ‘बेस्ट’ची मोनोच्या खांबाला धडक !

बेस्ट बसच्या चालकाला अपस्माराचा (फीट) झटका आल्याने त्याचे नियंत्रण सुटून बस मोनोच्या खांबाला धडकली. ही घटना सकाळी चेंबूर वसाहत परिसरात घडली. बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते; पण यात कुणीही घायाळ झाले नाही

राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने !

ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.

निवडणूक आयोग शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

‘शिवसेना कुणाची ?’, हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटांना न देता कायमस्वरूपी गोठवू शकते. अशा स्थितीत दोन्ही गटाला नव्या चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागतील.

नीरव मोदी यांची २५३ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून कह्यात !

महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँकेमधील आर्थिक अपहारातील आरोपी आणि हिर्‍याचे व्यापारी नीरव मोदी यांची २५३ कोटी ६२ लाख रुपयांची ‘हाँगकाँग’मधील मालमत्ता केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील कारागृहात आहेत.