Voice of Bangladeshi Hindus Appeal  : ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संस्थेने भारतातील हिंदूंना अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन !

ढाका (बांगलादेश) – गेल्या ५० वर्षांत बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था झाली आहे. गेल्या २ महिन्यांपासून तेथे वर्ष १९७१ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात देशव्यापी हिंदुविरोधी आक्रमणांचे सत्र चालू असल्याचे तेथील विविध हिंदु नेत्यांनी ‘सनातन प्रभात’ला कळवले.

अशातच ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ नावाची हिंदु संस्थाही तेथील हिंदूंवर होणार्‍या प्रत्येक अत्याचाराच्या घटनेला वाचा फोडण्यासाठी कटीबद्ध आहे. त्यांच्या ‘एक्स’वरील @VHindus71 नावाच्या या खात्यावरून प्रतिदिन बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जात आहे.

या संस्थेला आर्थिक साहाय्याची आवश्यकता असून त्यांनी भारतातील हिंदु जनतेला अर्थसाहाय्य करण्याची विनंती केली आहे. या संस्थेला साहाय्य करण्यासाठी पुढील इमेल पत्त्यावर ‘पेपाल’द्वारे (PayPal) पैसे पाठवले जाऊ शकतात : [email protected]

पुढील मार्गिकेवर जाऊनही ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे पाठवता येतील : paypal.com/paypalme/voiceofBangladeshiHi

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या रक्षणार्थ कार्यरत असलेल्या अशा संस्थांना साहाय्य करणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे !