उमेश कोल्हे यांच्या हत्येतील आरोपीवर कारागृहात आक्रमण: ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मुंबई – भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ प्रसारित करणारे अमरावती येथील पशूवैद्यकीय औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शाहरूख पठाण तथा बादशाह हिदायत खान याच्यावर आर्थर रोड कारागृहात आक्रमण झाले.

या प्रकरणी पोलिसांनी बंदीवान कल्पेश पटेल, हेमंत मनियार, अरविंद यादव, संदीप जाधव, श्रवण आवणे यांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या सर्वांना कह्यात घेतले आहे.

उमेश कोल्हे हे २१ जूनच्या रात्री औषधालय बंद करून घरी जात असतांना शाहरूख पठाण याने त्यांची गळा चिरून निर्घृण हत्या केली होती.