छगन भुजबळ यांच्याकडून मुंबईचा ‘कोंबडी’ असा उल्लेख !

छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई ही सोन्याची अंडे देणारी ‘कोंबडी’ आहे. ती कापून खायची का ? त्यावर भाजपच्या सदस्या मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेत हरकतीचे सूत्र उपस्थित केले.

मुंबईतील सर्व पुलांचे करण्यात येणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ !

मुंबईतील ‘धोकादायक’ म्हणून घोषित करण्यात आलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ‘गोपाळ कृष्ण गोखले पूल’ पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी अशी घोषणा केली.

‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ घेणार्‍या महानगरपालिकेचे स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष !

कचर्‍याचे ढीग साठलेले असणार्‍या नवी मुंबईने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ घेणे हास्यास्पद !

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !

विधीमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली’ हे ‘अ‍ॅप’ उपलब्ध !

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ‘अ‍ॅप सिद्ध केले असून विधीमंडळ कामकाजाविषयी माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ‘अ‍ॅप’चा वापर करावा.

मुंबईमध्ये ५ सहस्र ५०० आशासेविका करणार आरोग्यसेवांचे सर्वेक्षण ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.

रस्ता रुंदीकरणासाठी घाटकोपर येथील मंदिर तोडले; मशीद हटवण्याला मात्र बगल !

एक वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी येथील राधाकृष्ण मंदिर आणि श्री साईबाबा यांचे मंदिर, तसेच येथील ताहिरा मशिद अन् हुसैनी मशीद पाडण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता; मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला.

आय.एन्.एस्. मुरगाव भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू !

‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आय.एन्.एस्. मुरगाव ही दुसरी युद्धनौका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे.

मुंबई भाजपकडून ‘माफी मागो’ आंदोलन !

‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्षमा मागावी’, ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे ठिकठिकाणी रोष प्रकट करून निदर्शने केली.

महाविकास आघाडीकडून मोर्च्याद्वारे शक्तीप्रदर्शन

महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, तसेच बेरोजगारी आदी विविध प्रश्नांविषयी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला.