नथुराम गोडसे यांना खलनायक ठरवल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडू !

‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ चालू आहे. मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन चालू असतांना ‘अमर हुतात्मा हिंदु महासभे’ने निर्मात्यांना काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शित केला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ‘भारतरत्न’ आणि ‘परमवीर चक्र’ पुरस्‍कारांनी सन्‍मान करावा ! – जय हिंद सैनिक संस्‍था

मरणोत्तर ‘भारतरत्न’ आणि ‘परमवीर’ पुरस्‍कार देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्‍मान करावा, अशी मागणी ‘जय हिंद सैनिक संस्‍थे’चे महासचिव जनार्दन जंगले यांनी २० जानेवारी या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केली.

एस्.टी. महामंडळाच्‍या बसगाड्यांच्‍या काचांवर देवतांची चित्रे किंवा स्‍टीकर लावू नयेत !

बसगाड्यांच्‍या काचांवर देवतांची चित्रे न लावण्‍याचा आदेश म्‍हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

वेणूगोपाल धूत यांची तात्‍काळ सुटका करण्‍याचे निर्देश !

आयसीआयसीआय बँक व्‍हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी व्‍हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना १ लाख रुपयांच्‍या जामिनावर मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २० जानेवारी या दिवशी जामीन संमत केला आहे, तसेच त्‍यांना तात्‍काळ कारागृहातून सोडण्‍याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्‍यांनी भयमुक्‍त होऊन परीक्षेला सामोरे जावे ! – भगतसिंह कोश्‍यारी, राज्‍यपाल

जे लोक चिंता करतात, त्‍यांचे जीवन तणावग्रस्‍त असते. जे काम आपण करत आहोत, ते भयमुक्‍त होऊन करायला हवे. ‘वॉरियर्स’ होणे म्‍हणजे आपण प्रथम भयमुक्‍त होणे होय.

एस्.टी. महामंडळात ५ सहस्र ३०० नवीन वातानुकूलित इलेक्‍ट्रिक गाड्या येणार !

गाड्या वातानुकूलित असल्‍या, तरी गाड्यांच्‍या तिकिट दरामध्‍ये वाढ करण्‍यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्‍पन्‍न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्‍यात येत आहेत.

देहलीपासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शहरांच्‍या विकासासाठी सामर्थ्‍य आणि इच्‍छाशक्‍ती यांची कोणतीही न्‍यूनता केंद्रशासनामध्‍ये नाही; परंतु मुंबईसारख्‍या शहरामध्‍ये महानगरपालिकेसारख्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही.

स्‍वत: लक्ष घालून आश्‍वासनांच्‍या पूर्ततेचा विषय मार्गी लावीन ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

विधीमंडळाच्‍या कामकाजाच्‍या दृष्‍टीने आश्‍वासन समिती महत्त्वाची आहे. यांतील प्रलंबित विषय सोडवण्‍यासाठी विलंब झाला असेल, तर अध्‍यक्ष म्‍हणून मी स्‍वत: लक्ष घालून हा विषय मार्गी लावीन, असे आश्‍वासन विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांनी दिले.

मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ९ जण जागीच ठार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे प्रलंबित काम आणि वाढते अपघात यांमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इयत्ता पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही !

हे आहेत पाश्चात्त्य मेकॉले शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! कुठे विद्यार्थ्यांना सर्व विषयांत पारंगत करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणारी गुरुकुल पद्धत, तर कुठे प्राथमिक गणितही सोडवू न शकणारे विद्यार्थी निर्माण करणारी मेकॉले शिक्षणपद्धत !