शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती !

मुंबई – शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी या दिवशी एका संयुक्त पत्रकार एकत्रित परिषद घेऊन ही घोषणा केली. या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यामुळे भविष्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या पक्षांकडून एकत्रितपणे लढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे. न्यायसंस्थेतही दमदाटी चालली आहे. वैचारिक प्रदूषण रोखणे, देशहित आणि राज्यघटनेचे पावित्र्य अबाधित राखणे, यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी ‘आमच्या एकत्रित येण्यामुळे निवडणुकीत पालटाचे राजकारण चालू होईल’, असे सांगितले.