२० राज्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार !
मुंबई – डिजिटल सक्षमीकरण आणि कामांचे डिजिटल परिवर्तन या उद्देशाने मुंबईमध्ये आजपासून ‘ई गव्हर्नन्स’ प्रादेशिक परिषदेला प्रारंभ होत आहे. केंद्रशासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग अन् महाराष्ट्र शासन यांद्वारे २३ आणि २४ जानेवारी या दिवशी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथून ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २३ जानेवारी या दिवशी या परिषदेचे उद़्घाटन होईल.