हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात निर्धार !
मुंबई, ३ एप्रिल (वार्ता.) – ‘राष्ट्र’ हे धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत’ हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट्स’ आहे’, असे सांगून एक मतप्रवाह निर्माण करत आहेत. अशा प्रकारे अनेकांकडून भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला तोडण्याचे काम चालू आहे. वैचारिक माध्यमातून हिंदु राष्ट्र संकल्पनेला छेद देणार्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. मुलुंड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांच्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते.
'राष्ट्र' ही संकल्पना धर्म आणि परंपरेशी संबंधित असते. काँग्रेसचे राहुल गांधी 'भारत' हे 'नेशन' नसून 'युनियन ऑफ स्टेट्स' आहे', असे सांगून एक 'नैरेटिव' तयार करत आहे. ते भारत हे 'राष्ट्र' नाहीच असे सांगून 'हिंदु राष्ट्र' या संकल्पनेलाच छेद देत आहेत.#HinduRashtra @HinduJagrutiOrg pic.twitter.com/zcD5nNiNWd
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) April 4, 2023
मुसलमान संघटना व्यापाराच्या माध्यमातून हलाल उत्पादने विक्रीद्वारे भारताला पुन्हा गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व प्रकारच्या जिहादांचे कंबरडे तोडण्यासाठी त्यांना अर्थपुरवठा करणार्या हलाल अर्थव्यवस्थेला रोखणे आवश्यक असल्याचे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी हलाल प्रमाणपत्राच्या हिंदूविरोधी षड्यंत्राविषयी मार्गदर्शन करतांना केले.
या २ दिवसीय अधिवेशनात अधिवक्ता, उद्योजक, डॉक्टर, दुर्गप्रेमी, माहिती-अधिकार कार्यकर्ते, विविध संप्रदाय, मंडळे आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनातमध्ये गड-दुर्ग यांवरील आक्रमण, धर्मांतर, हलाल प्रमाणपत्र, लव्ह जिहाद, लँड जिहाद आदी हिंदु धर्मावरील विविध आघात रोखण्याविषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मंदिर सुव्यवस्थापन, गड-दुर्ग संवर्धन यांसह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील कार्यक्रमांचे नियोजनही या वेळी करण्यात आले.
अमली पदार्थांविषयी कठोर कायदे करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, उच्च न्यायालय, मुंबई
कलियुगात हिंदु समाजाच्या अधःपतनाचे मूळ अमली पदार्थांच्या अधीन झालेल्या जिहादी प्रवृत्तीच्या चित्रपटसृष्टीमध्ये आहे. सध्या समाजावर हिंदी चित्रपटसृष्टीचा इतका प्रभाव आहे की, समाजही व्यसनाधीन झाला आहे. चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी अमली पदार्थांविषयी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे.
सावरकर यांनी क्षमा मागितल्याचा प्रचार करणे ही विकृती ! – दुर्गेश परुळकर, सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते
गांधीहत्येत सहभागी असल्याचा सावरकर यांच्यावरील आरोप दिशाभूल करणारा आहे. यासाठी विरोधक कपूर समितीच्या अहवाल पुढे करतात, त्यामध्ये कुठेही तसा उल्लेख नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे; मात्र सावरकर यांच्यावर आरोप करणारे सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्षमा मागितली’, असा अपप्रचार करण्याचा विकृतपणा केला जात आहे.
वीर सावरकर यांच्या धर्मध्वजाखाली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न व्हावेत ! – सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
हिंदु धर्मावर होत असलेल्या अनेक आक्रमणांमुळे हिंदूंना संघटित करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला. त्यांनी वर्ष १९३९ मध्ये ‘ही पिढी नाही, तर पुढची पिढी तरी हिंदु राष्ट्र निर्माण करेल’, असे म्हटले होते. वीर सावरकर यांच्या हिंदु धर्मध्वजाखाली हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
हिंदुत्वनिष्ठ विचारांचे पत्रकार सिद्ध करा !- स्वप्नील सावरकर, संपादक, हिंदुस्थान पोस्ट
हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कायम त्यांची बातमी जशीच्या तशी प्रसिद्ध व्हावी, अशी इच्छा असते; परंतु माध्यमे नेमकी त्याविरोधात बातमी प्रसिद्ध करतात; कारण माध्यमांमध्ये ८० टक्के मनुष्यबळ हे डाव्या विचारांचे आहे. तुमची बातमी पत्रकार, उपसंपादक लावू शकत नाही, त्याचे अधिकार संपादकाला असतात. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ विचारांचे पत्रकार सिद्ध करा आणि हिंदुत्वनिष्ठ विचारांचे संपादक निर्माण करा.
राष्ट्रासाठी वेळ, विचार, कौशल्य यांचे दान देणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्राची स्थापना होणे हे ईश्वरी नियोजन आहे. आपण सर्वजण त्यासाठी केवळ माध्यम आहोत. ईश्वरी अधिष्ठान ठेवून हे कार्य करायचे आहे. हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. येणारा आपत्काळ अंतर्मुख करणारा आणि तुम्ही धर्म कि अधर्म यांच्यासमवेत आहात ? असे विचारणारा आहे. देशासाठी वेळ, विचार, कौशल्य यांचे दान देण्याची आवश्यकता आहे.
चर्चमधील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी लक्ष घातले पाहिजे ! – उन्मेष गुजराती, संपादक, ‘द स्प्राऊट’
पुणे येथील एका चर्चमध्ये १३ मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण आम्ही उघडकीस आणले. अशाच प्रकरणात आरोपी असलेला अन्य एका चर्चमधील फादर ५ वर्षे फरार होता. प्रत्यक्षात तो उघडपणे फिरत असल्याची बातमी लावल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. चर्चमध्ये लैंगिक अत्याचारांची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. हिंदु जनजागृती समितीप्रमाणे अन्य संघटनांनीही यात लक्ष घातले पाहिजे.
धर्मबंधूना साहाय्य करणे हे प्रत्येकाचे उत्तरदायित्व ! – अनंत करमुसे, जिल्हा कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ठाणे
धर्मबंधूना साहाय्य करणे हे प्रत्येकाचे उत्तरदायित्व आहे. लढण्याची प्रेरणा दैवत आणि गुरु देतात. देशात विविध प्रकारचे जिहाद चालू आहेत. यांतील सर्वांत मोठा जिहाद हिंदूंच्या मनाचा आहे. ‘माझा अब्दुल असा नाही’, हा हिंदूंच्या मनात असलेला जिहाद (भ्रम) दूर करणे आवश्यक आहे. हिंदूंच्या मनातील हा जिहाद नष्ट करण्याची शिकवण पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी धारकर्यांना दिली आहे.
गड-दुर्ग संवर्धनासाठी एकत्र कार्य करण्यात येणार !
‘गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण आणि संवर्धन’ या विषयावर परिसंवादामध्ये शंभू दुर्ग प्रतिष्ठानचे महासचिव श्री. संजय चौधरी यांनी याविषयी आलेले अनुभव सांगितले. या वेळी गड-दुर्ग रक्षणासाठी एकत्रितपणे करण्यात येणार्या कृती-कार्यक्रमांविषयी नियोजन ठरवण्यात आले. हिंदु राष्ट्रासाठी झोकून देऊन संघटितपणे कार्य करण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त केला.