श्री गणेशमूर्ती हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय असल्‍याने मूर्तीवर शिक्‍का मारणे अयोग्‍य !

अशी सूचना का करावी लागते ?

‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल ! एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

२२ ते २७ ऑक्‍टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्‍यात येतील. २७ ऑक्‍टोबरला मुंबईतून विशेष रेल्‍वेने हे कलश देहलीकडे रवाना करण्‍यात येतील. त्‍या वेळीही मोठा सांस्‍कृतिक आणि देशभक्‍तीपर कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल कदम, महापालिकेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त, ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, ‘फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस’चे भागीदार आणि कर्मचारी, ‘स्नेहा कॅटरर्स’चे भागीदार, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा या गुन्ह्यात उल्लेख केला आहे. हा घोटाळा अनुमाने ६ कोटी ३७ लाख रुपयांचा असल्याचे अन्वेषणामध्ये समोर आले आहे.

गणेशोत्सव जवळ आला असतांना १३ पूल धोकादायक असल्याची दिली चेतावणी !

केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?

मुंबई महानगरपालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या ९९ मंडळांची अनुमती नाकारली !

रस्‍त्‍यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ९९ सार्वजनिक मंडळांना मुंबई महापालिकेने अनुमती नाकारली आहे.

५० ‘मायक्रॉन’हून अल्‍प जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास मुंबईत ५ सहस्र रुपये दंड !

मुंबई महानगरपालिकेने शहरात २१ ऑगस्‍टपासून प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवर बंदीचा आदेश लागू केला आहे. यामध्‍ये ५० ‘मायक्रॉन’पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्‍यात येणार आहे.

आरे वसाहतीच्‍या तलावातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणार ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

कित्‍येक वर्षांपासून येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ‘वनशक्‍ती’ संघटना ही नेहमीच हिंदु समाज आणि विकास यांच्‍या प्रश्‍नांच्‍या विरोधात भूमिका घेते’, असा आरोपही आमदार भातखळकरांनी केला आहे.

मुंबई शहराच्‍या प्रवेशद्वारांवरील पथकर नाके तातडीने बंद करा ! – आमदार आदित्‍य ठाकरे

रस्‍ते आणि पूल यांसाठी पथकर लावणार आणि त्‍याच वेळी मुंबई महानगरपाकिलेकडूनही अधिकचा कर वसूल केला जाणार, हा मुंबईकरांवर अन्‍याय आहे. त्‍यांवर कायमस्‍वरूपी तोडगा काढणे आवश्‍यक आहे’, अशी मागणी आदित्‍य ठाकरे यांनी या पत्रामध्‍ये केली आहे.

८ ऑगस्‍टपर्यंत मुंबईमध्‍ये आवश्‍यक बसगाड्या उपलब्‍ध होतील ! – मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री

भाडेतत्त्वावरील १ सहस्र ६७१ बसगाड्यांच्‍या चालकांनी बंद पुकारला आहे. या गाड्यांऐवजी आतापर्यंत एस्.टी. महामंडळ आणि खासगी आस्‍थापने यांकडून १ सहस्र २७१ गाड्या आम्‍ही उपलब्‍ध केल्‍या आहेत. उर्वरित ४०० गाड्या ८ ऑगस्‍टच्‍या सायंकाळपर्यंत उपलब्‍ध होतील

मुंबईमध्‍ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारणार !

‘कृत्रिम तलाव’ ही धर्मविरोधी संकल्‍पना असल्‍याने तिचा अवलंब करण्‍यापेक्षा वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि धर्माचरण करावे !