श्री गणेशमूर्ती हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय असल्‍याने मूर्तीवर शिक्‍का मारणे अयोग्‍य !

मंगलप्रभात लोढा यांची मुंबई महानगरपालिकेला सूचना !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गणेशोत्‍सवकाळात श्री गणेशमूर्तीची मनोभावे पूजा केली जाते. ‘श्री गणेशमूर्ती’ हा हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय आहे. त्‍यामुळे मूर्तीवर शिक्‍का मारणे अयोग्‍य आहे. मूर्तीवर शिक्‍का मारण्‍याचा निर्णय रहित करावा, अशी सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला दिली आहे. (अशी सूचना का करावी लागते ? – संपादक) पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती ओळखता यावी, यासाठी मूर्तींवर वेगवेगळ्‍या प्रकारचे शिक्‍के मारण्‍याची सूचना मुंबई महानगरपालिकेकडून देण्‍यात आली आहे. या निर्णयाच्‍या विरोधात हिंदूंनी मंगलप्रभात लोढा यांच्‍याकडे तक्रारी केल्‍या होत्‍या. याविषयी मंगलप्रभात लोढा म्‍हणाले की, श्री गणेशमूर्तीला रंग दिल्‍यास किंवा शिक्‍का मारल्‍यास हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या जातील, त्‍यापेक्षा प्रशासनाने अन्‍य पर्याय शोधावा. उत्‍सव काळात कुणाच्‍याही श्रद्धेला धक्‍का लागणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्‍यावी.