३३ सहस्र ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक अन् भित्तीपत्रके हटवली !

इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील रस्ते धुण्यास प्रारंभ !

मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.

आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. वायकर यांनी मुंबई येथील जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर १ पंचतारांकित उपाहारगृह बांधल्यासंबंधीची तक्रार होती.

३५० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणार !

‘वायू’ या आस्थापनाने सिद्ध केलेले पदपथावरील दिवे ५० ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून त्यातही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.

६ अजगरांसह २ घोरपडी, एक पाल आणि एक सरडा यांची चोरी !

प्राणीसंग्रहालयातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय.

मुख्याध्यापकांना १० वीच्या न्यून निकालासाठी नोटीस !

मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळांचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा न्यून लागला आहे, अशा ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे.

राजकीय ‘बॅनरबाजी’ !

राज्‍यातील सध्‍याचे राजकीय वातावरण पहाता प्रत्‍येक पक्ष आपले मोठेपण सिद्ध करण्‍यासाठी आटापिटा करत आहे. गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने ठिकठिकाणी झळकलेले राजकीय फलक आणि कमानी यांमध्‍ये सर्वच पक्षच अग्रस्‍थानी दिसत आहेत.

‘ईडी’कडून ८ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !   

‘जंबो कोविड सेंटर’ घोटाळ्यात आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता. यात सुजित पाटकर यांना अनधिकृतरित्या कंत्राट दिले गेल्याचा दावा करण्यात आला, तसेच बनावट देयके दाखवून अतिरिक्त लाभ मिळवला गेला, असा आरोप सुजित पाटकर आणि आधुनिक वैद्य बिसुरे यांच्यावर करण्यात आला आहे.

श्री गणेशमूर्ती हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय असल्‍याने मूर्तीवर शिक्‍का मारणे अयोग्‍य !

अशी सूचना का करावी लागते ?

‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल ! एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

२२ ते २७ ऑक्‍टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्‍यात येतील. २७ ऑक्‍टोबरला मुंबईतून विशेष रेल्‍वेने हे कलश देहलीकडे रवाना करण्‍यात येतील. त्‍या वेळीही मोठा सांस्‍कृतिक आणि देशभक्‍तीपर कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.