पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण ‘सीबीआय’कडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !
पालघर येथील साधूंच्या निर्घृण हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ एप्रिल या दिवशी होणार आहे.