तारांकित प्रश्नांच्या तासिकेत विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचे कामकाज २ वेळा स्थगित !
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नानंतर २ मिनिटे बोलण्यासाठी वेळ देण्याचे आश्वासन देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.