मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून राज ठाकरे यांच्‍यावरील गुन्‍हा रहित !

राज ठाकरे

मुंबई – डोंबिवली महानगरपालिकेच्‍या निवडणुकीच्‍या वेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍यावरील गुन्‍हा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने १० नोव्‍हेंबर या दिवशी रहित केला. वर्ष २०२१ मध्‍ये प्रचाराच्‍या वेळी राज्‍य निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती. त्‍यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला होता. गुन्‍हा रहित करण्‍यात यावा, यासाठी राज ठाकरे यांनी न्‍यायालयात धाव घेतली होती. याविषयीची सुनावणी पूर्ण झाली होती; मात्र न्‍यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्‍यायमूर्ती अजय गडकरी आणि न्‍यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्‍या खंडपिठाने गुन्‍हा रहित केल्‍याचा निर्णय घोषित केला.