विधीमंडळाचे अधिवेशन संपायला आले, तरी एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा नाही !

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला केवळ ३ दिवस शिल्लक असतांना राज्यात चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी !

श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाविषयी केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत…

सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक !

खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

महाराष्ट्रातील ५५ साखर कारखान्यांची अवैध विक्री करून सहकारक्षेत्रावर दरोडा टाकण्यात आला ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

आपल्याच कह्यात असलेल्या राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांकडून अनुउत्पादक कर्ज घ्यायचे, कारखाने बुडित काढून पुन्हा सहकारी बँकेच्या कह्यात द्यायचे आणि अल्प किमतीमध्ये हेच कारखाने विकत घेऊन पुन्हा सहकारी बँकांची लूट करायची.

एस्.टी.कर्मचार्‍यांच्या संपावरून अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ !

राज्यात गेल्या ४ मासांपासून चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाविषयी सरकारने चर्चा करून निर्णय घ्यावा. आजचे सभागृहाचे कामकाम बाजूला ठेवून याविषयी चर्चा करण्यात यावी, अशी मागणी भाजपने प्रस्तावाद्वारे केली;

कोकणातील जेटी कामाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यासह अन्य सदस्यांनी मंत्री अस्लम शेख यांना धारेवर धरले !

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे साखरीआगर येथे जेटीच्या कामाला वर्ष २०१२ मध्ये प्रारंभ होऊनही अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. या संदर्भात एका अधिकार्‍याने ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, तरी ….

१०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये सरकारचे अपप्रकार उघड करणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राज्यातील उत्तम असणार्‍या ४-५ बँकांपैकी एक असलेल्या मुंबै बँकेला जाणून-बुजून लक्ष्य केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. या नात्याने सरकारचे अपप्रकार मी उजेडात आणत आहे.

शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास शाळेची मान्यता रहित करणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल.

उष्माघाताच्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

यापुढील काळात उष्माघात टाळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे ?’, असे औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री बोलत होते.

फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर शेतकर्‍यांची वीज तोडणार नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री

पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !