भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांविषयी सरकारकडून समाधानकारक उत्तरे नाहीत ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विधानसभेत चकार शब्दही काढला नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाची ४१० मिनिटे वाया; २ कोटी ८८ लाख रुपयांची हानी !

सत्ताधारी आणि विरोधक यांनी वाया गेलेला वेळ आणि आर्थिक हानी यांचा गांभीर्याने विचार करायला हवा !

३१ मार्चपर्यंत संप मागे घेतल्यास कारवाई करण्यात येणार नाही !

कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, यासाठी मी ७ वेळा आवाहन केले आहे. एस्.टी.च्या संपामुळे ४८ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. १९ अपघात झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल.

जुन्या योजनेनुसार निवृत्ती वेतन द्यायचे झाल्यास वर्ष २०२५ पर्यंत सर्व महसुली जमा सरकारी वेतन आणि निवृत्ती वेतन यांवर व्यय करावे लागेल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

जुन्या योजनेनुसार निवृत्ती वेतन देण्याविषयी राखून ठेवलेला तारांकित प्रश्न आमदार सुधीर तांबे यांनी उपस्थित केला. त्यावर पवार यांनी वरील माहिती दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्ष आणि भाजप हे अपकीर्त होत आहेत.

१८१ सोनोग्राफी चाचणी केंद्रांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा, तर १५ केंद्रांची मान्यता रहित ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

गर्भलिंग निदान चाचणीच्या संदर्भात कायदेशीर तरतुदींचा भंग केल्याचे प्रकरण

हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !

मागील वर्षभरात जुगाराच्या ४२९, तर मद्याच्या १ सहस्र ६० तक्रारी ! एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे हे पोलीस आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल !

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून मिळालेले १५० कोटी रुपये काश्मिरी हिंदूंसाठी दान करावे !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?

नगर जिल्ह्यातील तळे, विहीर आणि शिंदे गावांत जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात पाणीपुरवठा करू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री

नगर जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात या तिन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याचे दायित्व घेतो, असे आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना दिले.

मुंबई येथील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींविषयी निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

शहरातील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या आणि अंशत: भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या इमारतींमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी १ समिती गठीत करून १ मासात निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत घोषित केले.