हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू, ओळखीच्या संतांचा आश्रम उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता हरिद्वारमधील स्वतःची वास्तू, तसेच ओळखीच्या संतांचा आश्रम विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.

हरिद्वार येथील कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील सायकली, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत. तसेच १० सुस्थितीतील सायकली आवश्यक आहेत.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वार कुंभमेळ्यासाठीच्या आरोग्याविषयीच्या सिद्धतेविषयीचा अहवाल मागितला !  

असा अहवाल न्यायालयाला मागवावा लागतो, याचा अर्थ सरकार आणि प्रशासन निष्क्रीय आहेत, असाच होतो !

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

कोरोना संकटातही वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा भरणार !

कोरोनाच्या संकटातही वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा भव्य-दिव्य होईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. या घोषणेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी आखाडा परिषदेसमवेत एक बैठक घेतली.