१ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात हरिद्वार कुंभमेळा होणार ! – उत्तराखंड सरकारचा निर्णय

नवीन रेल्वे किंवा बस यांना अनुमती नाही !

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकारच्या मंत्रीमंडळाने हरिद्वार कुंभमेळा १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करण्याला संमती दिली आहे. कोरोनाच्या संकटाकडे पहाता सरकारकडून हा कालावधी ठरवण्यात आला आहे.

सध्या मेळा क्षेत्रातील हॉटेल, आश्रम आणि आखाडे येथे साडेपाच लाख लोक रहाण्याची क्षमता आहे. तसेच सरकारने रात्रीच्या निवासासाठी केंद्रे बनवली आहेत. येथे १८ सहस्र लोक राहू शकणार आहेत. कुंभमेळ्याच्या काळात अन्य राज्यांतून कोणतीही नवीन रेल्वे किंवा नवीन बस चालू करण्यात येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.