कोल्हापूर येथे ८ जुलैला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धा !
८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रसिद्ध अशी मार्सेलीस उडी मारली. या उडीने तत्कालीन ब्रिटीश सरकार तर हादरलेच; पण ही उडी जगभरात चर्चेचा विषय बनली. या उडीच्या स्मरणार्थ ‘सावली सोशल सर्कल’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सावरकर जलतरण चषक’ या नावाने पोहण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.