माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी यांवर १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्‍याचा आरोप

उद्योजक संतोष शिंदे यांची पत्नी-मुलासह आत्‍महत्‍या केल्‍याचे प्रकरण !

प्रतिकात्मक चित्र (सौजन्य : पोलीसनामा संकेतस्थळ )

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) – ‘अर्जुन उद्योग समूहा’चे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह आत्‍महत्‍या केली आहे. संतोष शिंदे यांनी आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्‍यात १ कोटी रुपयांच्‍या खंडणीच्‍या प्रकरणी माजी नगरसेविका आणि एक पोलीस अधिकारी यांनी त्रास दिल्‍याचे नमूद केले आहे. या संदर्भात संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी तक्रार दिली आहे. (यात सत्‍यता असेल, तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांतील भ्रष्‍टतेचे हे विकृत प्रदर्शनच म्‍हणता येईल ! – संपादक)  शिंदे  तेल,  तसेच अन्‍य प्रकारची विविध उत्‍पादने यांची निर्मिती करत. महाराष्‍ट्र आणि कर्नाटक येथे त्‍याचा विस्‍तार केला होता. कोरोना काळात त्‍यांनी सामाजिक कामेही केली होती. काही दिवसांपूर्वी त्‍यांच्‍यावर बलात्‍काराचा आरोप करण्‍यात झाला होता आणि या प्रकरणी त्‍यांना जवळपास १ मास कारागृहात रहावे लागले होते.