बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल ! – केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना सल्ला

तथाकथित आणि ढोंगी पुरो(अधो)गाम्यांना श्रद्धा काय असते, हेच ठाऊक नसल्याने ते टीका करणारच ! त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, देशातील कोट्यवधी हिंदू अद्यापही श्रद्धावान आहेत. त्यामुळेच भारत अनेक संकटातही तरून जात आहे आणि पुढेही जात राहील !

‘आमचे कर्तव्य नाही’ असे तुम्ही म्हणू शकत नाही !- देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

देहलीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यामुळे देहली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना फटकारले. केंद्र सरकारने हे आपले दायित्व नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ‘हे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे दायित्व आहे.

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे एकाच रुग्णवाहिकेतून २२ जणांचे मृतदेह स्मशानभूमीकडे नेल्याचा संतापजनक प्रकार !

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत कोंबून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही ने-आण केली जाते. या प्रकरणी येथील रुग्णालयाच्या कारभाराविषयी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरकडून जादा आकारलेली रक्कम परत देण्याची तयारी !

पोलिसांच्या कारवाईत ‘ज्यांच्याकडून जादा रक्कम घेतली आहे, त्यांना ती परत करू’, अशी भूमिका हेल्थ केअर सेंटरने घेतली. त्यानुसार घेतलेली जादा रक्कम परत घेण्यासाठी नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरवर लोकांनी गर्दी केली.

सोलापूर शहरातील नादुरुस्त रुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी पावणे चार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संमती !

कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यकता भासल्यानंतर नादुरुस्त रुग्णालयांची दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव देणे म्हणजे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्या’सारखेच आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गर्दी

लसीकरणाची प्रसिद्धी केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी

दिवसभत ३८ रुग्णांच्या मृत्यूसह एप्रिल मासात कोरोनाचे एकूण २२४ बळी

मृतांमध्ये ३१ ते ९० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे, तसेच मृतांमध्ये ४ रुग्णांचे वय ४० वर्षांहून अल्प होते.

वाढत्या कोरोनाबाधितांमुळे गोव्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचाराला प्रारंभ होण्यासाठी किमान ६ घंटे प्रतीक्षा करावी लागत आहे.