नाशिक येथील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी २१ पोलिसांवर गुन्हा नोंद !

नाशिक जिल्हा रुग्णालय

नाशिक – जिल्हा रुग्णालयातून पोलीस कर्मचार्‍यांना गंभीर आजाराचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. ग्रामीण पोलिसांच्या अन्वेषणात २१ पोलीस कर्मचार्‍यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे आंतरजिल्हा स्थानांतर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांच्या प्रमाणपत्रावर अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीवास यांची स्वाक्षरी आहे. या पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी २१ सप्टेंबर या दिवशी दिली.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे !