धरणीचा पाडा (भिवंडी) येथे झोळीतून गरोदर महिलेला नेतांना बाळ दगावले

या मासातील दुसरी घटना !

गर्भवती महिलेला रुग्णालयात नेतांना

भिवंडी – तालुक्यातील धरणीचा पाडा येथील भागात रस्ते नसल्याने गरोदर महिलेला मुख्य रस्त्यावर नेतांना त्या महिलेची प्रसूती झाली आणि तिचे बाळ दगावले. रस्ते नसल्याने या महिलेला ५ ते ६ गावकरी चादरीची झोळी करून नेत होते. रस्ते नसल्याने पाणी आणि चिखल यांतून वाट काढत या महिलेला न्यावे लागले होते. गेल्या काही दिवसांतील या प्रकारची ही दुसरी घटना असल्याने दुर्गम भागात रस्ते नसल्याने गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतांना मोठी गैरसोय होत असल्याचे लक्षात आले आहे.