आज १३.४.२०२२ या दिवशी गुरु (बृहस्पति) ग्रहाचा मीन राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

१३.४.२०२२ या दिवशी दुपारी ३.४५ वाजता गुरु हा ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते.

भारतीय पंचांगाचे महत्त्व !

‘एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीय यांना विचारले, ‘‘कोणत्याही प्रकारचे निमंत्रण न देता इतका मोठा जनसमुदाय कुंभमेळ्यासाठी कसा येतो ?’’ त्यावर पं. मदनमोहन मालवीय म्हणाले, ‘‘केवळ सहा आणे (त्या काळातील साधारण ३५ पैसे) मूल्य असलेले पंचांग वाचून !’’

वाढदिवसाची विकृती !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या चांगल्या कृतीची जागा भयावह विकृतीने घेतली आहे. समाजामध्ये या विकृतींविषयी जनजागृती न केल्यास आणि धर्मशिक्षण न दिल्यास या पुढचे अपप्रकार पहायला मिळाले नाही तर नवलच ! अशी वेळ न येण्यासाठी हिंदु धर्मानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, हे सांगणे आवश्यक !

#Gudhipadva : गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.

#Gudhipadva : हिंदूंनो, नववर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेसच का ?

हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !

#Gudhipadva : गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा अन् प्रार्थना

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.

#Gudhipadva : जाणून घ्या पंचांगातील गुढीपूजन करतांनाचा ‘देशकाल’ !

कोणताही धार्मिक विधी करतांना देशकाल कथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेचा संकल्प करण्याआधी देशकाल म्हटले जाते. यातून मनुष्याला एकूण अनंत काळाची व्याप्ती कळून येते. यातून त्याला स्वत:च्या सूक्ष्मत्वाची जाणीव झाल्याखेरीज रहात नाही.

#Gudhipadva : गुढीपाडव्याला कोणती प्रार्थना करावी ?

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना !

#Gudhipadva : VIDEO – गुढीपाडव्याचे अद्वितीय महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा ! या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

गुढी उभारण्याची पद्धत आणि त्याचा पूजाविधी : पहा VIDEO

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस (२ एप्रिल २०२२) म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.