गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनांनी त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येते.
या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.
#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष