जाणून घ्या कारणे !
नैसर्गिक
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-‘संपाता’वर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (अध्याय १०, श्लोक ३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते.
आध्यात्मिक
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ चालू झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
ऐतिहासिक
अ. या दिवशी रामाने वालीचा वध केला.
आ. या दिवशी शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
इ. या दिवसापासूनच ‘शालिवाहन शक’ चालू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !
#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !