#Gudhipadva : गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा अन् प्रार्थना

प्रतिज्ञा

१. ‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.

२. व्यष्टी साधना, म्हणजे नामजपादी धर्माचरण करून आणि समष्टी साधना, म्हणजे राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करून हिंदु धर्माची पताका संपूर्ण विश्वभर फडकवू’, अशी आम्ही ब्रह्मध्वजासमोर प्रतिज्ञा करतो.’

प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा आणि हे प्रतिपालक श्रीविष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य अन् सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणाऱ्या शक्तीतील चैतन्य आमच्यामध्ये सातत्याने टिकू दे. आम्हाला मिळणाऱ्या शक्तीचा वापर आमच्याकडून साधनेसाठी, गुरुसेवेसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी केला जाऊ दे’, हीच आपल्याचरणी प्रार्थना.

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष