ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

‘दत्त’ शब्द सार्थ ठरवला ! – उदय देशपांडे

अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या १०४ व्या जन्मोत्सवानिमित्त शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. देशपांडे बोलत होते.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी समाजातील वंचित घटकांसाठी काम केले ! – विलास पुजारी, पोलीस निरीक्षक

प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्रीदत्त देवस्थानच्या दादाजी प्रसादालयात शहर आणि परिसरातील १०० गरीब अन् गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे विनामूल्य वाटप करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी पुजारी बोलत होते.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)

योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. या सिद्धींचा ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच उपयोग केला. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी केलेली अनेक भाकिते अत्यंत तंतोतंत ठरली.

कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सूक्ष्मातून जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयी श्री. अतुल पवार यांना आलेल्या अनुभूती

योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केल्यानंतर वेळोवेळी सूक्ष्मातून सत्संग देणे आणि ‘ते साधकाच्या समवेत असून निर्गुणातून शिकवत आहेत’, अशी अनुभूती येणे

आज शेवगाव (नगर) येथे ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ पुरस्‍कार वितरण सोहळा !

‘गुरुदत्त सामाजिक संस्‍थे’च्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन पुरस्‍कार वितरण सोहळा त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ५ मे म्‍हणजेच बुद्ध पौर्णिमेला  दुपारी ४ वाजता येथील वैशंपायननगरमधील श्रीदत्त देवस्‍थानच्‍या दादाजी प्रसादालयात होणार आहे.

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्‍यात्मिक बोधामृत’ हा ग्रंथ वाचतांना सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना झालेला लाभ आणि जाणवलेली सूत्रे !

‘कल्‍याण येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे उच्‍च कोटीचे संत होते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही त्‍यांची महती सांगितली आहे. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्‍यात्मिक बोधामृत’ हा ग्रंथ वाचतांना मला योगतज्ञ प.पू. दादाजींचे चैतन्‍य मिळते आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने प्रतिदिन साधना, कर्म, भक्‍ती..

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सूक्ष्मातून अस्‍तित्‍व जाणवणे

माझे रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या प्रवेशद्वाराजवळील औदुंबराच्या वृक्षाकडे लक्ष गेले. तेव्‍हा ‘औदुंबराच्या वृक्षाखाली प्रत्‍यक्ष दत्तगुरूंचा वास असतो’, या विचाराने माझी भावजागृती झाली

केडगाव (पुणे) येथे पू. शरद वैशंपायन यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘कलियुगके त्रिकालदर्शी ऋषि ! योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनजी’ या ग्रंथाचे प्रकाशन !  

प.पू. नारायण महाराज स्थापित श्री दत्तमंदिरात, दत्तजयंतीला सनातन-निर्मित ‘कलियुगके त्रिकालदर्शी ऋषि ! योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनजी’ या ग्रंथाचे प्रकाशन !