सनातनची ग्रंथमालिका : ‘योगतज्ञ दादाजी यांचे चरित्र आणि शिकवण’ !
योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. या सिद्धींचा ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच उपयोग केला. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी केलेली अनेक भाकिते अत्यंत तंतोतंत ठरली. ते आयुष्यभर अत्यंत साधे अन् संन्यस्ताप्रमाणे जीवन जगले. सनातन संस्थेवर त्यांची विशेष कृपा होती. ‘निःस्वार्थी भावाने जनकल्याणासाठी समर्पित जीवन !’, जगणार्या तपस्वी व्यक्तीमत्त्वाचे आणि लोकोत्तर कार्याचे अनेक पैलू प्रस्तुत ग्रंथात उलगडून दाखवले आहेत.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री. अतुल पवार
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत (साधना, कर्म, भक्ती आदींविषयी मार्गदर्शन !)
योगतज्ञ दादाजी यांनी ‘जीवन कसे जगावे ?, साधना करण्याची आवश्यकता, स्वभावदोष-निर्मूलनासाठी करायचे प्रयत्न, मन समर्थ कसे बनवावे ?, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व’ अशा अनेक विषयांवर विविध नियतकालिकांतून लेखन केले आहे. हे लेखन या ग्रंथात दिले आहे. विविध साधनामार्गांतील साधकांसह सर्वसामान्य लोकांनाही उपयुक्त ठरेल, असे योगतज्ञ दादाजी यांचे चैतन्यमय मार्गदर्शनही ग्रंथात दिले आहे. त्यांचे सुविचार आणि पत्रव्यवहारही ग्रंथात दिला आहे. त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य दर्शवणार्या वैज्ञानिक चाचण्या वाचून त्यांच्या अद्वितीयत्वाचे पैलू वाचकांना या ग्रंथातून लक्षात येतील.