श्री गुरूंच्‍या अवतारी कार्यात उत्तम ‘समष्‍टी शिष्‍य’ बनून सहभागी व्‍हा !

‘गुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करून मोक्षप्राप्‍ती केल्‍यानेच गुरुऋण फेडता येते’, असे गुरुगीतेमध्‍ये सांगितले आहे.

श्री गुरूंच्‍या ऐतिहासिक धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात दायित्‍व घेऊन सेवा करा !

आता हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होण्‍याचा काळ जवळ आला आहे; पण भविष्‍यात संपूर्ण राष्‍ट्ररचना अध्‍यात्‍मावर आधारित होण्‍यासाठी आजपासून कृती करणे, हे धर्मसंस्‍थापनेचे कार्य आहे. श्री गुरूंच्‍या या ऐतिहासिक धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात दायित्‍व घेऊन सेवा करा !

गुरुप्राप्‍तीची खूण

‘ज्‍या वेळी गुरुशक्‍तीचा आपल्‍या अंतर्यामी प्रवेश झाल्‍याचा तुम्‍हाला अनुभव येईल, त्‍या वेळी तुम्‍हाला आपल्‍या गुरूंची ओळख पटेल. गुरु प्राप्‍त झाल्‍याची ती खूण आहे.’

वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधनेचा लाभ घ्‍या ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आता भारताला धर्माधिष्‍ठित राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी, म्‍हणजेच भारतात रामराज्‍य स्‍थापनेसाठी प्रयत्न करणे, हीच वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधना आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्‍यावा !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासम त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी, जशा वेदांसम श्रुति-स्‍मृति !

वर्ष २०२२ मधील दत्तजयंतीच्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आध्‍यात्मिक उत्तराधिकारपत्र दिले.

शिवभक्ताच्या रूपात साक्षात् शिवाने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिरात दर्शन देणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कांचीपूरम् येथील प्रसिद्ध एकांबरेश्वर शिव मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. त्या वेळी शिवभक्ताच्या रूपात साक्षात् शिवाने त्यांना मंदिरात दर्शन दिल्याप्रमाणे जाणवलेला प्रसंग येथे देत आहोत.

गुरुपौर्णिमेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात काढलेल्‍या गुरुपादुकांच्‍या रांगोळीविषयी सौ. स्नेहल गांधी यांना आलेल्‍या अनुभूती

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुपूजन झाल्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घातल्‍याचे दृश्‍य आठवून रांगोळीतील गुरुपादुकांना प्रदक्षिणा घालणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पाणी आणि आरसा यांच्‍याप्रमाणे निर्मळ असल्‍याने त्‍यांची त्‍वचा अन् नखे यांना त्‍यांनी नेसलेल्‍या चंदनाच्‍या रंगाच्‍या सोवळ्‍याचा रंग आला असणे

‘वर्ष २०२२ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी महर्षींनी ‘सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी’त सांगितल्‍याप्रमाणे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पाद्यपूजा करण्‍यात आली. तेव्‍हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणांचे छायाचित्र काढण्‍यात आले

नको भोग वा योग काही । नको कीर्ती, ऐश्वर्य जे अशाश्वत राही ।। प्रार्थितो आम्ही श्रीमन्नारायणस्वरूपी । सदा चित्त राहो गुरुपादपद्मी ।।

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दिव्य कृपाछायेखाली आम्हाला मोक्षपथावर मार्गक्रमण करता येऊ दे. त्यांच्या चरणी सर्व साधकांची श्रद्धा अढळ राहू दे, ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कळकळीची प्रार्थना !