‘वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’त सांगितल्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पाद्यपूजा करण्यात आली. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांचे छायाचित्र काढण्यात आले आणि ते येथे (छायाचित्र २) देण्यात आले आहे. त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे चंदनाच्या रंगाचे सोवळे नेसले होते. छायाचित्रात ते आपल्याला दिसत आहे.
या छायाचित्रांतून असे लक्षात येते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांचा रंग चंदनाच्या रंगाप्रमाणे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या त्वचेचा रंगही चंदनाप्रमाणे दिसत आहे. खरेतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची त्वचा आणि नखे यांचा मूळ रंग फिकट गुलाबी आहे. (छायाचित्र १ पहा)
छायाचित्र १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची गुलाबीसर रंग असलेली मूळ त्वचा आणि नखे
छायाचित्र २ : पाद्यपूजेनंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चंदनाप्रमाणे दिसणारी त्वचा आणि नखे
त्वचा आणि नखे यांचा रंग चंदनाच्या रंगाच्या सोवळ्याप्रमाणे दिसण्यामागील कारण
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची त्वचा आणि नखे यांचा रंग त्यांनी नेसलेल्या चंदनाच्या रंगाच्या सोवळ्याप्रमाणे दिसत असल्याचे कारण असे लक्षात आले की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदी विराजमान आहेत. त्यामुळे ते ईश्वराप्रमाणे ‘सच्चिदानंद’ स्थितीत, म्हणजे सत्, चित् आणि आनंद या स्थितीत आहेत. ते दोषविरहित आणि त्रिगुणातीत आहेत. त्यामुळे ते पाण्याप्रमाणे निर्मळ आणि आरशाप्रमाणे स्वच्छ आहेत. पाण्याला स्वतःचा रंग नाही आणि ते ज्या रंगाच्या पात्रात घालू, त्याप्रमाणे त्याला रंग येतो. आरशामध्येही समोर असलेल्या घटकाच्या रंगाप्रमाणे रंग प्रतिबिंबीत होतो. त्याप्रमाणेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात निर्मळता आहे आणि म्हणून त्यांनी नेसलेल्या चंदनाच्या सोवळ्याचा रंग त्यांची त्वचा आणि नखे यांना दिसून आला.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |