Attack On Hindus : गोपालगंज (बिहार) येथे मंदिरासाठी देणगी गोळा करणार्‍या हिंदूंवर मशिदीतून प्राणघातक आक्रमण

एक हिंदु तरुण गंभीररित्या घायाळ

गोपालगंज (बिहार) – येथील इजमाली गावात पंचमुखी हनुमान मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर धर्मांध मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केले. यात अनेक जण घायाळ झाले. त्यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. गोपाळगंज आणि सिवान जिल्ह्यांतील पोलीस मोठ्या संख्येने गावात तैनात आहेत. पोलीस दोन्ही पक्षांशी चर्चा करत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी चालू आहे.

प्रथम दगडफेक, नंतर काठ्या आणि धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण ‘

बदरजिमी गावातील काही हनुमान भक्त पंचमुखी हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करत होते. २० मार्च या दिवशी मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारंभ आणि रथयात्रा आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी प्रचार अन् निधी संकलन केले जात आहे. या संदर्भात जेव्हा भाविकांचा एक गट सिवान जिल्ह्यातील इजमाली गावात पोचला, तेव्हा त्यांच्यावर अचानक आक्रमण करण्यात आले. यात घायाळ झालेल्या हिंदूंनी आरोप केला आहे की, मुसलमानांच्या मशिदीजवळ आम्ही पोचलो असता तेथून आक्रमण करण्याची घोषणा करण्यात आली आणि नंतर लगेचच दगड अन् काठ्या यांद्वारे आमच्यावर आक्रमण झाले. काही मुसलमानांनी धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. (मशिदींमध्ये याचा साठा असतो, असेच आतापर्यंतच्या घटनांवरून दिसून आले आहे. अशा मशिदींना सरकार टाळे का ठोकत नाही ? – संपादक) यात मिरगंज येथील रहिवासी नितीश चौहान गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

भगवे कपडे घातल्याने करण्यात आले आक्रमण !

घायाळ हिंदूंनी असाही आरोप केला आहे की, आम्ही भगवे कपडे घातले होते; म्हणून आम्हाला लक्ष्य करण्यात आले. या आक्रमणामागे धार्मिक कट्टरता आणि पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंवर मशिदीतून सातत्याने आक्रमणे होतात आणि सरकार अशा ठिकाणांवर काहीही कारवाई करत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !
  • हिंदूंचे रक्षण करणार्‍यांना आणि धर्मांधांवर कठोर कारवाई करणार्‍यांना हिंदू कधी निवडून देणार ?