श्री गुरूंच्‍या ऐतिहासिक धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात दायित्‍व घेऊन सेवा करा !

गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘श्री गुरु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ज्ञानशक्‍तीद्वारे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची दृष्‍टी दिली आहे. ही हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना, म्‍हणजे अध्‍यात्‍मावर आधारित राष्‍ट्ररचना (धर्मसंस्‍थापना) होय. केवळ अवतारच असे कार्य करू शकतात ! आज सर्वत्र हिंदु राष्‍ट्राची चर्चा होणे, हे केवळ श्री गुरूंच्‍या ज्ञानशक्‍तीचे फलित होय. आता हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होण्‍याचा काळ जवळ आला आहे; पण भविष्‍यात संपूर्ण राष्‍ट्ररचना अध्‍यात्‍मावर आधारित होण्‍यासाठी आजपासून कृती करणे, हे धर्मसंस्‍थापनेचे कार्य आहे. श्री गुरूंच्‍या या ऐतिहासिक धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात दायित्‍व घेऊन सेवा करा !’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्‍मिक उत्तराधिकारी, सनातन संस्‍था (१४.४.२०२३)