Anil Deshmukh On Aurangjeb Tomb : (म्हणे) ‘बाबरी मशिदीचा व्रण ताजा असतांना औरंगजेबाची कबर उखडण्याचे वक्तव्य अयोग्य !’ – अनिल देशमुख, नेते, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

वर्तुळात श्री. अनिल देशमुख

मुंबई – महाराष्ट्रात हिंदु-मुसलमान एकोप्याने रहात आहेत. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचे वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करण्याचे काम बजरंग दल करत आहे. सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. बाबरी मशिदीचा व्रण ताजा असतांना औरंगजेबाची कबर उखडण्याचे वक्तव्य अयोग्य आहे, असे विधान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी आक्रमणकारी बाबर आणि क्रूरकर्मा औरंगजेब यांच्याविषयी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना व्यक्त केली. बजरंग दलाने पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची चेतावणी दिली. त्यावर अनिल देशमुख यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेष्ट्या आक्रमणकर्त्यांविषयी कळवळावाटणारे नेते आणि त्यांचा पक्ष यांना हिंदूंनी मते का द्यावीत ?