५०० हून अधिक धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प
सोलापूर, २४ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. गुढी पाडव्याच्या निमित्ताने या वर्गांमध्ये येणार्या धर्मप्रेमींनी धर्मशास्त्रानुसार गुढीचे पूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. सामूहिक गुढीपूजनाने हिंदूंमधील संघटनशक्ती अधिक वाढल्याचेच हिंदूंनी या वेळी अनुभवले. शहरातील विडी घरकूल, रामदेवनगर, शेळगी, दत्तनगर, नवीन घरकुल, हनुमाननगर, बालाजी व्हिलाज, विष्णुनगर, स्वागतनगर यांसह अन्य ठिकाणी, तर जिल्ह्यातील बार्शी, चपळगाव, अक्कलकोट, पिलीव, धोत्री यांसह एकूण २० ठिकाणी सामूहिक गुढी उभारण्यात आली. बचेरी येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रवचनाला उपस्थित असलेल्या धर्मप्रेमींनी प्रभु श्रीरामाचा सामूहिक नामजपही केला.