गोवा सरकारकडून कर्नाटकच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

‘म्हादई प्रवाह प्राधिकरण’ या जलतंट्यामध्ये प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या प्राधिकरणाच्या अनुमतीविना केंद्र सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला अनुमती देऊ शकत नाही – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मोगलांचे उदात्तीकरण !

हे शिक्षण खात्याच्या लक्षात आले नाही का ? शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यात लक्ष घालून त्वरित उपाययोजना काढावी, ही अपेक्षा !

गोवा : अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी संशयिताची न्यायालयाकडून निर्दाेष सुटका

पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

संपूर्ण देशात शहर किंवा एखादा परिसर यांची नावे पालटण्याच्या मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. ‘बाम्बे’चे नाव मुंबई, ‘बेंगलोर’चा उल्लेख ‘बेंगळुरू’, मद्रासचे नाव ‘चेन्नई’ असा करण्यात आले आहे. गोव्यातही नामांतराची ही मोहीम राबवली पाहिजे.

मडगाव (गोवा) येथील पोर्तुगीजकालीन इमारतीतील आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळला

सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली.

गोवा : ६ वर्षांच्या कालावधीत आमदारांच्या आजारपणावर सरकारकडून १५ कोटी रुपये खर्च !

आमदारांना आणि कुटुंबाला वैद्यकीय देयकांचे परतावा (रिफंड) दिला जातो. वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत अनेक आमदारांना वैद्यकीय देयके भरण्यासाठी १५ कोटी १५ लाख रुपये खर्च केले.

गोव्यात ५० इंच पावसाचा टप्पा पार : जनजीवन विस्कळीत

राज्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, घर आणि इतर संसाधने यांची हानी होणे असे प्रकार चालूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील ६ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची (ऑरेंज अलर्ट) चेतावणी दिली आहे.

कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

म्हादई पाणी तंटा लवादाने कळसा आणि भंडुरा नाला पेयजल प्रकल्पासाठी पाणी वापरण्यास यापूर्वीच अनुमती दिलेली आहे. पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार !

राज्यसभेच्या एका जागेसाठी गोव्यात २४ जुलैला निवडणूक

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित झाले आहे, तर घोषणेची औपचारिकता केवळ बाकी आहे. विरोधी काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतलेली नसल्याचे दिसत आहे.