गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.

परशुराम घाटात करण्यात येत आहे महामार्गावर पडलेल्या भेगांची दुरुस्ती

‘या महामार्गावर पडलेल्या भेगा सिमेंटने भरण्यात येत आहेत. या मार्गावर  काँक्रिटिकरणास आवश्यक असलेला १४ दिवसांचा कालावधी मिळाला नसतांना या मार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली होती.

मडगाव (गोवा) नगरपालिका इमारतीत पाण्याची गळती झाल्याने महत्त्वाची कागदपत्रे खराब होण्याची भीती

राज्यात सर्वत्र विकासाद्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असतांना पालिकेतील कागदपत्रे इमारतीतील गळतीमुळे नष्ट होण्याची वेळ कशी काय येते ? या समस्येवर अत्याधुनिक उपाययोजना नाही कि उपाययोजना काढायची इच्छाशक्ती नाही ?

गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत !

‘कदंब’ बसगाड्यांवरील पानमसाल्याची विज्ञापने हटवणार ! – कदंब महामंडळ

कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.

सनातन संस्थेच्या वतीने गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत मान्यवर वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये मान्यवर वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

आवश्यकता भासल्यास अबकारी घोटाळ्याचे अन्वेषण दक्षात खात्याकडे सोपवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

या घोटाळ्याची खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्‍यच !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध !

विदेशी झाडे लावून केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे, हे महमार्ग विभागाला केव्हा  समजणार ?

गोव्यात समान नागरी कायद्याला गेल्या ६० वर्षांत कुणाकडूनही विरोध नाही ! – मुख्यमंत्री 

काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष, ते स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांची मागणी करत नाहीत. जर विरोधी पक्षाला या दोन्ही गोष्टी देशात लागू करायच्या असतील, तर त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.