गोवा : कोलवाळ कारागृह प्रशासनाची कारागृहात अचानक तपासणी

भ्रमणभाष संच आणि तंबाखूजन्य पदार्थ कह्यात घेतले !

पणजी, २७ जुलै (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कारागृह प्रशासनाने अचानक कारागृहातच तपासणी केली. या वेळी अधिकार्‍यांना बंदीवानांकडे भ्रमणभाष संच आणि तंबाखूजन्य पदार्थ सापडले आहेत. एका गृहरक्षक कर्मचार्‍याकडे तंबाखू सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात टाकलेल्या धाडीत सिगारेट, अमली पदार्थ आदी सापडले होते, तसेच कारागृहात काही दिवसांपूर्वी वर्चस्ववादातून २ गटांमध्ये हाणामारीही झाली होती. कोलवाळ मध्यवर्ती कारागृह हे चैनीचे केंद्र ठरत आहे

संपादकीय भूमिका

कारागृह रक्षक आणि बंदीवान यांचे संगनमत असल्याविना भ्रमणभाष संच आणि इतर पदार्थ कारागृहात बंदीवानांपर्यंत कसे पोचतील ? अशा कारागृह रक्षकांना शोधून त्यांना कारागृहात टाका !