खनिज निधी योजनेविषयीच्या अधिसूचनेला गोवा शासनाने अनुमती न घेतल्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा ठपका
राज्यशासनाकडून ही योजना १ जानेवारी २०२१ या दिवशी अधिसूचित करण्यात आली होती.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ
प्रवेशबंदी आदेशात गृह खाते म्हणते, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी याच्या गोवा प्रवेशाने गोव्यात तणाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रवेशबंदीत वाढ करण्यात आली आहे.
गोवा शासन शेतकर्यांना सौरऊर्जेवर चालणारे ११ सहस्र पंप विनामूल्य पुरवणार !
नागरिक वीजपुरवठा खंडित झाल्यास या बल्बचा वापर करू शकणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना राज्यात थेट प्रवेश देण्यास उच्च न्यायालयाकडून शासनाला अनुमती
उच्च न्यायालयाकडून शासनाला अनुमती मिळाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा (डोस) घेऊन १४ दिवस उलटल्यानंतर ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी किंवा ‘अँटीजन’ या चाचण्या न करता नागरिकांना गोव्यात प्रवेश करता येणार आहे.
शासनाला स्वातंत्र्यसैनिकांचा आदर नाही ! – गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा सापडला कंत्राटदाराच्या गोदामात !
श्री गणेशचतुर्थीसाठी राज्यशासन नवीन नियमावली प्रसिद्ध करणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी; मात्र मूर्तींची तपासणी केली जात नाही !
राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आहे; मात्र अशा मूर्तीं राज्यात नाहीत, असे ठामपणे सांगणे कठीण आहे; कारण गोवा राज्य प्रदूषण मंडळाने राज्यभरातून मूर्तींचे नमुनेच गोळा केलेले नाहीत.
महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात पणजी येथील आझाद मैदानात काँग्रेसचे आंदोलन
येथील आझाद मैदानात बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
गोवा शासनाने आधी जारी केलेली गणेशोत्सवाशी संबंधित मार्गदर्शक नियमावली आक्षेपार्ह सूत्रांमुळे केली स्थगित !
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी जारी केलेली नियमावली स्थगित केल्याची माहिती संबंधित सर्व अधिकार्यांना दिली आहे, तसेच लवकरच नव्याने नियमावली प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे.