साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
फोंडा (गोवा) – स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा आणि भाव असणार्या श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ (वय ८२ वर्षे) सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमात ही मंगलमय घोषणा करण्यात आली.
या वेळी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांचे पुत्र तसेच हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांच्या सून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि नातू श्री. सोहम् (वय २४ वर्षे) हे उपस्थित होते.
सुश्री कला खेडेकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
गेली अनेक वर्षे कुटुंबातील सदस्याप्रमाणे सिंगबाळ कुटुंबियांच्या घराचे दायित्व सांभाळणार्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे या मंगलप्रसंगी घोषित करण्यात आले.