माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ !
आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत.
आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत.
सत्र न्यायालयाचा निर्णय रहित करत मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत केली आहे. त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बारचालकांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी वसुलीच्या आरोपाचे प्रकरण
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. यासाठी त्यांची १२ घंट्यांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.
१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीसाठी उपस्थित रहात नव्हते.
भोसरी येथील भूमी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंबियांविरोधात ईडीने आरोपपत्र प्रविष्ट केले. खटल्याला अनुपस्थित राहिल्याने पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले…
डी.एस्. कुलकर्णी यांनी ठेवीदारांचे पैसे न दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर ‘ईडी’ने हा बंगला कह्यात घेतला होता. तेव्हापासून हा बंगला बंद आहे.
रस्त्याचे काम या आस्थापनाकडून नंतर सईद खान यांच्या ‘भूमी कन्स्ट्रक्शन आस्थापना’ला देण्यात आले आहे. यावरून वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ‘ईडी’च्या पथकाकडून चौकशी चालू आहे.
आयकर विभागाच्या पथकाने येथील एका मोठ्या हॉटेल समुहावर धाडी टाकल्या असून हे प्रकरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
विविध भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी समन्स बजावताच नेते न्यायालयाची पायरी चढत आहेत, मग चौकशी कशी करायची ? असा प्रश्न अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) अधिवक्त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी उच्च न्यायालयात उपस्थित केला.