मुंबई – मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च न्यून करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ‘आरोग्य आपल्या दारी’ मोहीम चालू करण्यात आली असून याद्वारे घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून ‘शून्य औषध चिठ्ठी’ (झिरो प्रिस्क्रीप्शन) योजनेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ मार्च या दिवशी अचानक भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
योजनेसाठी १५०० कोटी रुपयांचे प्रावधान केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी दवाखान्यातील साठवणूक कक्ष, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छतागृह यांची पहाणी केली.